नागपूर ,
Datta Jayanti सीताराम दत्त दरबार, रेशिमबाग येथे २८ नोव्हेंबरपासून दत्त सप्ताहाची सुरुवात झालेली आहे. असून परिसर भक्तिमय वातावरणाने भारला आहे. सकाळी आरती, श्री गुरुचरित्र पाठ आणि संध्याकाळी आरतीसोबत प्रसाद वितरण अशा धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सप्ताहांतर्गत १ डिसेंबर रोजी शारदा महिला भजन मंडळातर्फेभजनांचा कार्यक्रम झाला. Datta Jayanti ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ५ डिसेंबर रोजी गोपाळकाला प्रसाद वितरणाने दत्त सप्ताहाची सांगता होईल.
सौजन्य:कल्पना गडवे,संपर्क मित्र