काँग्रेसच्या कॅव्हेटमुळेच देवळी नप निवडणूक स्थगित

deoli-wardha-local election आ.बकाने व माजी खा. तडस पत्रपरिषद

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
देवळी, 
 
 
deoli-wardha-local election देवळी नगरपरिषदेची निवडणूक स्थगित होण्यामागे काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश वैद्य यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेली कॅव्हेट न्यायसंगत नव्हती असा गंभीर आरोप माजी खासदार रामदास तडस यांनी केला. माजी खासदार रामदास तडस यांच्या कार्यालयात आज ४ रोजी आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस यांच्या संयुत पत्रकार परिषदेत निवडणूक स्थगितीमागील घटनांची तपशीलवार माहिती त्यांनी दिली.
 
 
 
 
deoli-wardha-local election
 
(पत्रकार परिषदेतील दृश्य) 
 
 
deoli-wardha-local election माजी खा. तडस पुढे म्हणाले, देवळी नगरपरिषद निवडणुकीची अधिसूचना घोषित झाली होती आणि मतदानाची तारीख २ डिसेंबर अशी जाहीर झाली होती. दरम्यान काँग्रेसचे उमेदवार सुरेश वैद्य यांनी २१ नोव्हेंबरला उच्य न्यायालय नागपूर खंडपीठात कॅव्हेट दाखल केली. ही सूचना राज्य निवडणूक आयोगाला २४ नोव्हेंबरला प्राप्त झाली. २९ नोव्हेंबरला आयोगाने ज्या नगरपरिषदांचे २२ नोव्हेंबरपर्यंत अपील निकाली निघाले नाही अशा सर्व निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला. देवळी नगरपरिषद प्रकरणात जिल्हा न्यायालयाचा निकाल २४ नोव्हेंबरला लागला असला तरी सुरेश वैद्य यांनी दाखल केलेल्या कॅव्हेटचा परिणाम म्हणून देवळी नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली. १८ नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्र छाननीदरम्यान भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा तडस यांनी सुरेश वैद्य यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदविला होता. हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी फेटाळला.
 
 
 
deoli-wardha-local election २० रोजी शोभा तडस यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केली. दोन दिवस सुट्टीमुळे २४ रोजी न्यायालयाने अपील फेटाळले. परंतु, हे प्रकरण जिल्हा न्यायालयात असतानाच काँग्रेस उमेदवाराने उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणे अयोग्य आणि न्यायसंगत नसल्याचे तडस यांनी स्पष्ट करत काँग्रेस आणि इतर विरोधकांनी निवडणूक स्थगितीला भाजपा जबाबदार असल्याचा खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल केली असल्याचे माजी खासदार तडस म्हणाले. प्रत्यक्षात संपूर्ण जबाबदारी काँग्रेसच्या उमेदवारावर असल्याचे ते म्हणाले. तर आ. राजेश बकाने म्हणाले की, राज्यातील २४ नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या असून या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर तीव्र नाराजी दर्शविली आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देवळी नगरपरिषद निवडणूक स्थगित न करण्याची विनंतीही निवडणूक आयोगाकडे केली होती, असे त्यांनी नमूद केले.
 
 
 
deoli-wardha-local election भाजपा देवळीत निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज होती आणि प्रचारात आघाडीवर होती. नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे भाजपाचे उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी होण्याचे वातावरण होते. विरोधकांना हार डोळ्या समोर दिसत असल्याने काँग्रेस व इतर विरोधकांनी राजकीय फायदा घेण्यासाठी चुकीचे आरोप करीत असल्याचे दोन्ही नेत्यांनी केले की निवडणूक स्थगितीची खरी कारणे काँग्रेसच्या कॅव्हेटमध्ये असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला राहुल चोपडा, भाजपा अध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा तडस, डॉ. नरेंद्र मदणकर, रवींद्र करोटकर, शुभांगी कुर्जेकर, विभावरी बजाईत, विश्वजिता पोटदुखे यांची उपस्थिती होती.