सेलू,
Dindoda village, तालुयातील दिंदोडा (मदनी) हे गाव धाम नदी काठावरील सेलू तालुयातील शेवटचे गाव असून या गावचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. धामनदीच या गावची जीवनवाहिनी आहे. नदीकाठ शिवारात आईचे मंदिर आहे. पूर्वी येथे श्रावण मासाच्या पर्वावर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच पाणग्यांचा स्वयंपाक आणि महाप्रसाद व्हायचा. आजघडीला आईच्या मंदिरापर्यंत जायला रस्ताच नसल्यामुळे हा उत्सव आता पूर्णपणे बंद झालेला आहे. रस्ता नसल्याने शेती करण्यासाठी व धार्मिक कार्यक्रमाला खिळ बसली आहे.

धाम नदी तिरावर निसर्गरम्य वातावरणात, सुंदर कोल्हापुरी बंधारा असून सौंदर्यीकरण होऊ शकते. परंतु, शेतात जाण्याकरिता धामनदी काठावरील दिंदोडा गावापासून तर आई मंदिर मार्गे टाकळी हा अडीच-तीन किमीचा पांदण रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे. या रस्त्याने बैलबंडीने तर सोडाच पायदळी जाणेही कठीण झाले आहे. या पांदण रस्त्याने जाताना अनेक बैलांचे पाय मोडले. अनेक लोक जखमी झाले. शेतकर्यांचे मणयाचे तसेच कमरेचे त्रास वाढले. रस्त्यात मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. पाऊस झाला तर ये-जा बंद होते. आजूबाजूला झुडपी जंगल आहे. झुडपी जंगलांमुळे रानडुकरांचा हैदोस असून रोहिंचाही शेतकर्यांना प्रचंड त्रास असतो. वानरांचे तर मोठ मोठे कळप शेतामध्ये धुडगूस घालतात.
सन २०११ पासून या Dindoda village, पांदण रस्त्याची सुव्यवस्था व्हावी म्हणून शासन दरबारी अनेकदा निवेदन व पत्रव्यवहार केला. मात्र, सदर पांदण रस्ता झाला नाही. हा रस्ता बांधकामासाठी मंजूर झाला, असेही मागील वर्षापासून अनेकदा सांगितल्या गेले. परंतु, हा पांदण रस्ता कोणत्या खड्ड्यात फसला हे अद्यापही कळायला मार्ग नाही. शेती वहिवाट करताना शेतकरी त्रस्त झाले आहे. भविष्यात हा पांदण रस्ता झाला तर या रस्त्याने दुतर्फा औषधी वनस्पती, आंबा, चिंच, डाळिंब, कडूनिंब, कवट, बोर यासारखी मोठमोठी दीर्घकालीन वृक्ष, फळझाडे, रोपवाटिका उभ्या राहू शकतात. शेतकरी रात्री-बेरात्री आपल्या शेतामध्ये जाऊ शकतात. ऊस यासारख्या नगदी पिकाची लागवड होऊ शकते. या पांदण रस्त्याचे बांधकाम झाले तर शेतीपूरक व्यवसाय वाढून शेतकर्यांची क्रयशतीही वाढून परिस्थिती बदलू शकते. सोबतच आईचे मंदिरात जाण्यासाठीही सोयीचे होणार असून पर्यटकांची गर्दी वाढून येथे बेरोजगारांनाही रोजगार मिळू शकते. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत हा पांदण रस्ता व्हावा, अशी मागणी शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.