दुबळवेल गुंज गटग्रामपंचायत सरपंच पदी चंद्रकांत देवढे कायम

नागपूर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
वाशीम,
Chandrakant Devdhe दुबळवेल गुंज ग्रामपंचायत च्या सरपंच पदी चंद्रकांत सुभाष देवढे यांना पदावर कायम करण्याचा निकाल नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.
 

JYTG 
 
दुबळवेल Chandrakant Devdhe  गुंज गटग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत सुभाष देवढे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन व्यायाम शाळा बांधकाम केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन वाशीम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी ५ मार्च २०२५ रोजी त्यांना सरपंचपदासाठी अपात्र घोषित केले होते. सदर निर्णया विरोधात देवढे यांनी आयुक्त अमरावती यांचेकडे अपील दाखल केले होते. त्यामध्ये आयुक्त अमरावती यांनी ०६ मे २०२५ रोजी आदेश पारित करून जिल्हाधिकारी वाशीम यांचा आदेश कायम ठेवला होता. सदर दोन्ही आदेशा विरोधात सरपंच देवढे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १५ मे २०२५ रोजी याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी पूर्ण होऊन २५ नोव्हेंबर २०२५ रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रफुल खुबळकर यांनी हा निर्णय दिला. यामध्ये न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले की, सरकारी जमिनीवर अतिक्रमण हे मंडळ अधिकारी तसेच पटवारी यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालावर हा निर्णय दिला होता. भूमी अभिलेख मालेगाव यांनी कोर्टामध्ये दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या अहवालात त्यांनी अतिक्रमणा बाबतीत कुठलाही उल्लेख केला नाही असे स्पष्ट केले.
 
चंद्रकांत देवढे यांच्या वतीने अ‍ॅड. राम कारोडे यांनी त्यांची बाजू मांडली. चंद्रकांत देवढे यांनी अतिक्रमण केल्याचे कोणतेही निर्णायक पुरावे नाहीत तसेच मंडळ अधिकार्‍यांनी अतिक्रमणाचा उल्लेख केलेले अहवालाद्वारे त्यांना अपात्र ठरवण्याची आवश्यकता नाही असे विद्यमान न्यायालयाने निर्णय देतांना स्पष्ट केले.