३०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ईडीची २० ठिकाणी छापेमारी

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |

ED ki red
 
 
नवी दिल्ली,
ED raids 20 places अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मॅक्सिझोन पॉन्झी योजनेतील मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला गती देत आज एनसीआर परिसरातील २० ठिकाणी धाड टाकल्या. गाझियाबाद, नोएडा आणि मेरठ येथे करण्यात आलेल्या या कारवाईत अनेक ठिकाणांची झाडाझडती घेण्यात आली. चंद्र भूषण सिंह आणि प्रियांका सिंह यांनी चालवलेल्या या योजनेत गुंतवणूकदारांना अवास्तव नफ्याचे आमिष दाखवून ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पैसे गोळा केल्यानंतर दोघेही फरार झाले होते. या प्रकरणातील मुख्य गुन्ह्यांमध्ये दोघांना अटक झाल्यानंतर ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीचे हे छापे या आर्थिक घोटाळ्याच्या विस्तृत जाळ्याचा मागोवा घेण्यासाठी आणि संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.