ईव्हीएम सील प्रकरणावर सालेकश्यात संताप

अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
गोंदिया,
Saleksa Nagar Panchayat election जिल्ह्यातील सालेकसा नगर पंचायत निवडणुक प्रक्रीया पार पडल्यानंतर मतदन यंत्राची सील उघडल्याच्या उमेदवार व समर्थकांच्या आरोपानंतर नगरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारानंतर निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधी पक्ष व नागरिकांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत 3 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात राडा घातला. अधिकार्‍यांना घेराव केला. आज 4 डिसेंबर रोजीही तहसील कार्यालयासमोर उमेदवार, समर्थक व नगरवासीयांनी आंदोलन संबंधित अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. आंदोलन चिघठत असल्याचे पाहून प्रशासनाने तत्काळ तहसीलदार मोनीका कांबळे यांना निवडणूक निर्णयअधिकारी पदावरून त्यांची उचलबांगडी करीत अर्जुनी मोरचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे संगीतले जाते. असे असले तरी निवडणूक प्रक्रियेत सहभागी देवरीच्या उपविभागीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे, सहायक निवडणूक अधिकारी प्रमोद कांबळे यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
 
 

Saleksa Nagar Panchayat election
निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळेंची उचलबांगडी
मतदान Saleksa Nagar Panchayat election आटोपल्यानंतर 2 डिसेंबर रोजी रात्री सालेकसा तहसील कार्यालय येथे मतपेट्यांचे सील उघडण्यात आल्याची माहिती उमेदवार व नगरवासीयांना होताच बुधवारी त्यांनी तहसील कार्यालयात एकच गोंधळ घातला. यावेळी संबंधित अधिकारी व सतत्तापक्षांच्या नेत्रूावर आरोप झाले. प्रसंगी तहसील कार्यालयाला छावणीचे रुप प्राप्त झाले होते. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यात आली मात्र ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. रात्री उशिरापर्यंत गोंघठ सूरू होता. आज सकाळपासून सालेकश्यात तनावपूर्णवातावरण होते. तथापि शहरात सर्वपक्षीय नेते, नगरवासीयांनी निवडणूक आयोग व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत शहरातील मुख्य चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली. दरम्यान या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडून पारदर्शक व निःपक्ष चौकशी करावी, देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे, सहायक निवडणूक अधिकारी प्रमोद कांबळे यांच्या मोबाईल फोन डेटाची तपासणी करावी, या अधिकार्‍यांना निलंबित करावे, नगरपंचायतीची निवडणूक पुन्हाहून घ्याव आदी मागण्या केल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला.