सडक अर्जुनी,
gondia-rehabilitation तालुक्यातील श्रीरामनगर येथील पुनर्वसित सर्व नागरिक गुरुवार ४ डिसेंबर रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकारगोंदी या मूळ गावी परत पोहोचले. ३ डिसेंबरपर्यंत शासन, प्रशासनाने मागण्या मंजूर न केल्यास ४ डिसेंबरला स्वगावी जाऊ, असे निवेदन दिले होते. २ व ३ डिसेंबरला महसूल, वनविभागाचे अधिकारी श्रीरामनगर येथे गेले होते.
gondia-rehabilitation गावकर्यांशी चर्चा केली. परंतु, मागण्यांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज गुरुवारी गावकरी ट्रॅक्टरवर सामान मांडून स्वगावी पोहोचले. त्यांच्या स्वगावी प्रशासकीय यंत्रणा गेली. त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. गावकर्यांचे समाधान झाले नाही. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत मूळ गाव सोडणार नाही, असा पवित्रा गावकर्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले.
gondia-rehabilitation पुनर्वसनाला तब्बल १३ वर्षे झालीत, पण गावकऱ्यांच्या १६ मूलभूत मागण्या आजतागायत अपूर्णच राहिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागण्यांची माहिती देत वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी हे पाऊल उचललेले आहे.