गोंदिया,
gondia-rto-acb परराज्यातून खरेदी केलेली जेसीबी यंत्राची गोंदिया आरटीओ कार्यालयात नोंदणी करण्याकरिता खाजगी इसमामार्फत 70 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त प्रभार) यांच्यावर नागपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज चार डिसेंबर रोजी कारवाई केली. राजेंद्र सदाशिव केसकर (५३) असे लाचखोर आरोपीचे नाव आहे. केसकर यांनी राजेश रामनिवास माहेश्वरी (५७) रा. रामनगर गोंदिया या खाजगी इसमामार्फत लाच स्वीकारली. तक्रारदार यांनी पश्चिम बंगाल येथून जेसीबी यंत्र खरेदी केले होते या जेसीबी यंत्राची गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करायची होती ही नोंदणी करण्यासाठी आरोपी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी खाजगी इसमामार्फत ७० हजार रुपयाची लाच मागितली.
gondia-rto-acb परंतु तक्रारदार यांना लाज देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ नोव्हेंबर रोजी तक्रार केली. १९ नोव्हेंबर रोजी खाजगी इसम राजेश माहेश्वरी यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्याने तक्रारदार यांना पश्चिम बंगाल येथून खरेदी केलेले जेसीबी वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथे नोंदणी करण्यासाठी टॅक्स व्यतिरिक्त ७० हजार रुपये रुपये लाच रक्कम त्यांचे करिता व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांचे करिता मागणी करून ही रुपये स्वतः स्वीकारण्यास सहमती दर्शवली. तसेच २५ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया यांची पडताळणी केली असता त्यांनी खाजगी इसम यांच्या राजेश माहेश्वरी यांना लाच मागणीस प्रोत्साहन दिले.
gondia-rto-acb या अनुषंगाने आज ४ नोव्हेंबर रोजी खाजगी इसम राजेश माहेश्वरी यांनी तक्रारदार यांचेकडून ७० हजार रुपये लाच रक्कम आरोपी राजेंद्र केसकर यांच्यासाठी व स्वतःसाठी स्वीकारली. आरोपीची आरोपी राजेश माहेश्वरीची अंग झळतीत लाचेचे ७० हजार रुपये व इतर १९०५९ रुपयांची रक्कम, एक मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी राजेंद्र केसकर यांना ताब्यात घेण्यात आले आहेत, घरझडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींवर गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988(सुधारणा 2018) कलम 7अ, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यांनी केली ''सापडा'' कारवाई gondia-rto-acb
नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिटटावार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे व पथकाने केली. अधिक तपास गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत उगले करीत आहेत.