नागपूर,
Hindi Mor Bhavan Birdi अर्पण सभागृह, हिंदी मोर भवन येथे निनाद संगीत विद्यालयाची संगीत सभा उत्साहात संपन्न झाली. विद्यालयाच्या संचालिका रेखा साने यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध गाण्यांची मैफल रंगली.
या कार्यक्रमात रेखा साने, पारुल लाभे, अलका धोडारीकर, अपूर्वा नाईक, मनिषा चौधरी, रोहिणी बापट, राधिका राजंदेकर, मोनाली दारव्हेकर, प्रशांत चौधरी, देविका गोखले, अपर्णा अकोले, प्राचक्ता कोटपल्लीवार Hindi Mor Bhavan Birdi आणि अमिता तिवारी यांनी गगन सदन, मोगरा फुलला, मलमली तारुण्य, मी राधिका रुपेरी वाळूत, जांभूळ पिकल्या झाडाखाली, त्या तिथे पलिकडे यांसारखी सुरेल गाणी सादर करून रसिकांची दाद मिळवली.कार्यक्रमाला परीमल जोशी, स्मिता देशपांडे, पंकज यादव आणि अक्षय हरले यांनी वाद्यसंगतीची साथ दिली.
सौजन्य:अंजली पांडे,संपर्क मित्र