मुंबई,
Malaika Arora अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहते. विशेषत: तिच्या रिलेशनशिपमुळे तिला नेहमीच लक्ष वेधले जाते. वयाच्या ५० व्या वर्षीही मलायका स्वतःच्या अटींवर जगण्याचा संदेश देत दिसते आणि नुकत्याच एका मुलाखतीत तिने हेच जोरदारपणे व्यक्त केले.
‘We The Women’ या शोमध्ये पत्रकार बरखा दत्त यांच्यासोबत संवाद साधताना मलायकाने महिला आणि पुरुष यांच्याबाबतची सामाजिक अपेक्षा आणि दुहेरी मानके स्पष्ट केली. तिने म्हटले, “खंबीर आणि स्वतःच्या अटींवर जगत असल्यामुळे तुम्हाला कायमच जज केलं जातं. माझ्या आयुष्यात काही पुरुष आले, त्यामध्ये काही खरंच प्रचंड प्रेरणादायी होते, त्यामुळे पुरुषांबद्दल मला सन्मान आहे.”मलायकाने पुरुष आणि महिलांवर येणाऱ्या सामाजिक दृष्टिकोनातील फरकांवरही प्रकाश टाकला. तिने सांगितले की, “जर पुरुष आपले जीवन पुढे नेत असतील, निर्यण घेतले असेल, घटस्फोटानंतर अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करत असतील, तर लोक त्याचे कौतुक करतात. पण हेच जर महिलांनी केलं तर तिला अनेक प्रश्न विचारले जातात, ‘ती असं का करतेय?’ अशी प्रतिक्रिया येते.”
मलायकाने Malaika Arora आपल्या आईच्या शिकवणुकीचा देखील उल्लेख केला. तिने सांगितले, “आई नेहमी सांगायची, ज्या मुलाला पहिल्यांदा डेट करशील, त्याच्याशी लग्न करु नकोस. मी तेच केलं. ज्याला पहिल्यांदा डेट केलं, त्याच्याशी लग्न केलं. आईने कायम आम्हाला स्वतंत्रपणे जीवन जगायला शिकवलं आहे.”खासगी आयुष्याकडे पाहिले, तर मलायका अरोरा वयाच्या २२ व्या वर्षी अभिनेता अरबाज खानसोबत विवाहबद्ध झाली होती. त्यांना एक मुलगा आहे. परंतु जवळपास १९ वर्षांच्या लग्नानंतर दोघांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अरबाज खानने दुसऱ्या लग्नाची नोंद घेतली आणि नुकताच त्याच्या पत्नी शु्रा खानने मुलीला जन्म दिला.मलायका अरोरा तिच्या वक्तव्याद्वारे आधुनिक महिला स्वतंत्रपणे आणि आत्मनिर्भरतेने जगण्यासाठी प्रेरणा देत आहे. सामाजिक दबाव आणि अपेक्षांपासून मुक्त राहून स्वतःच्या अटींवर जगण्याचा संदेश ती प्रत्येक स्त्रीसाठी पोहोचवत आहे.