अनिल कांबळे
नागपूर,
Missing minor girl कामावर जात असल्याचे सांगून घरातून निघालेली अल्पवयीन मुलगी रात्र झाली तरी घरी परतली नसल्याने चिंतातूर आई-वडिलांनी नवीन कामठी पाेलिस ठाणे गाठले. मुलगी अल्पवयीन असल्याने पाेलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी गांभीर्य दाखवून त्या मुलीचा शाेध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.
अल्पवयीन मुलगी Missing minor girl आईवडिलांना काेणतीही कल्पना देता घराबाहेर पडली. तिने कामावर जात असल्याचे शेजाèयांना सांगितले. सकाळी घराबाहेर पडलेली मुलगी रात्र झाली तरी ती परत न आल्याने पालक चिंतेत पडले. त्यांनी कामठी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन तातडीने शाेध सुरु केला. पाेलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाची मदत घेतली. दाेन्ही पथके मुलीचा शाेध घेत हाेते. मुलीच्या माेबाईलचे लाेकेशन तपासले. ते शिवणगाव मार्गावर असल्याचे आढळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख ललिता ताेडासे यांनी पथकाला लाेकेशनवर पाठवले. पथकाने तेथे पाेहचून मुलीची खात्री केली. मुलगी मैत्रिणीच्या घरी सुखरुप आढळून आली. मुलीची सुरक्षित सुटका केली. पाेलिस ठाण्यात आणून तिचे समुपदेशन केल्यानंतर मुलीला पालकांच्या स्वाधिन करण्यात आले. सुदैवाने ती मैत्रिणीच्या नातेवाईकांच्या घरी सुखरूप आढळल्याने आई- वडिलांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.