अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur stabbing वैद्यकीय शिक्षण घेण्याèया तरुणीवर तिच्या प्रियकराने खून करण्याच्या उद्देशाने चाकूहल्ला केला. प्रेयसी रक्ताच्या थाराेळ्यात पडल्यानंतर प्रियकराने चाकूने स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या केली. ही थरारक घटना आज गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास नंदनवन परिसरात घडली.
पाेलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय युवक हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील एका खेडेगावातील रहिवासी हाेता. त्याचे सख्ख्या मामाच्या 22 वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध हाेते. त्या तरुणीला बीएएमएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नागपुरातील महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यामुळे पाेलिस भरतीसाठी तयारी करीत असलेला युवकसुद्धा तिच्या पाठाेपाठ नागपुरात राहायला आले. दाेघांनीही नंदनवन काॅलनीत वेगवेगळ्या रुम किरायाने घेतल्या. दाेघांचेही प्रेमसंबंध कायम हाेते. दाेघेही एकमेकांच्या रुमवर येत-जात हाेते. गेल्या काही दिवसांपासून दाेघांमध्ये तिसèया युवकाने एंट्री घेतल्यामुळे वाद हाेत हाेते. मात्र, तिने फक्तवर्ग मित्र असल्याचे सांगून त्याची समजूत काढली हाेती. मात्र, त्याचा तिच्या चारित्र्यावर संशय कायम हाेता. बुधवारी ती तरुणी युवकाच्या घरी मुक्कामी आली हाेती. दाेघांचे पुन्हा त्याच मित्रावरुन वाद झाला. त्यानंतर युवकाने चाकूने प्रेयसीवर हल्ला केला. ती रक्ताच्या थाराेळ्यात पडल्यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नंदनवन पाेलिसांनी जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले तर युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. या प्रकरणाची नाेंद नंदनवन पाेलिसांनी घेतली असून नेमका काय प्रकार घडला, याबाबत चाैकशी सुरु आहे. या प्रकरणी नंदनवनचे ठाणेदार विनायक काळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.