वॉशिंग्टन,
Pakistani student arrested in America अमेरिकेत मोठा हल्ला टळला आहे. डेलावेअर राज्यात पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या आणि डेलावेअर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय लुकमान खानला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात बंदुका, दारूगोळा आणि बुलेटप्रूफ जॅकेट जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, त्याने अमेरिकेत सामूहिक गोळीबार करण्याचा कट रचला होता.
अटक झालेल्या लुकमानकडून पोलिसांनी एक हस्तलिखित नोटबुक जप्त केले ज्यात सर्वांना मारून टाका, शहीद होणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे अशी वाक्ये वारंवार लिहिलेली होती. त्यात डेलावेअर विद्यापीठ पोलिस स्टेशनचा नकाशा, प्रवेश-निर्गमन मार्ग, एका अधिकाऱ्याचे नाव, अतिरिक्त शस्त्रे कशी मिळवायची, हल्ला कसा करायचा आणि हल्ल्यानंतर तपास कसा चुकवायचा याची सविस्तर माहिती होती. अटकेनंतर एफबीआयने त्याच्या विल्मिंग्टन येथील घरी छापा मारला आणि रेड-डॉट स्कोप असलेली एआर-शैलीची रायफल, ग्लॉक पिस्तूल, पूर्णपणे स्वयंचलित मशीन गनमध्ये रूपांतर करणारे बेकायदेशीर उपकरण, ११ एक्सटेंडेड मॅगझिन, घातक हॉलो-पॉइंट गोळ्या आणि बुलेटप्रूफ जॅकेट जप्त केले. सर्व शस्त्रे बेकायदेशीर आणि नोंद न केलेली होती.