रायपूर,
rohit-anger-after-defeat दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूरमध्ये काल पराभवाचा सामना करावा लागला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३५९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते आणि सुरुवातीला विजयाची शक्यता जास्त वाटत होती, पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सामना पूर्णपणे फिरवून टाकला. यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली गेली.

सामना जिंकता येऊ शकल्याचं मुख्य कारण भारताची सुमार गोलंदाजी ठरली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दिशाहीन आणि असंतुलित बॉलिंग केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सहज चौकार आणि षटकार मिळाले. गोलंदाजीतील या त्रुटीवरुन माजी कर्णधार रोहित शर्माला संयम गमवावा लागला. त्यानी मैदानावरच प्रसिद्ध कृष्णाला थांबवले आणि हर्षित राणालाही बोलावून दोघांना ठोस मार्गदर्शन दिले. रोहितने दोन्ही युवा गोलंदाजांना फलंदाजांना सोप्या चौकारापासून कसे रोखायचे, योग्य लांबी आणि लाइन कशी ठेवावी, याचे स्पष्ट मार्गदर्शन केले. rohit-anger-after-defeat रोहितच्या चेहऱ्यावरून नाराजी स्पष्ट दिसत होती. ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या पाठलागाच्या ३७व्या ओव्हरमध्ये घडली. प्रसिद्ध कृष्णाने मॅथ्यू ब्रीट्झकेला डॉट बॉल दिला, त्याआधी त्याला चौकार लागला होता. ओव्हरमधील शेवटचे दोन चेंडू टाकण्यासाठी रनअप घेत असताना रोहितने त्याला थांबवले.
प्रसिद्धच्या गती आणि लाइनबद्दल रोहित नाराज होता. काही क्षणांनी हर्षित राणाही चर्चेत सहभागी झाला. रोहितने हातवारे आणि इशाऱ्यांचा वापर करून दोघांना कडक शिकवण दिली, विशेषतः प्रसिद्ध कृष्णाला, जो मॅथ्यू आणि डेव्हाल्ड बेव्हिसला केलेल्या गोलंदाजीच्या पद्धतीवर रोहितला नाराजी होती. रोहितच्या मार्गदर्शनानंतर प्रसिद्धने ओव्हर चांगल्या प्रकारे पूर्ण केला, फक्त दोन चेंडूत एक रन दिला. तरीही या सामन्यात भारताचा पराभव टाळता आला नाही. rohit-anger-after-defeat प्रसिद्ध कृष्णाने ८.२ ओव्हर्समध्ये ८५ धावा दिल्या आणि फक्त दोन विकेट्स घेतल्या, तर हर्षित राणाने १० ओव्हर्समध्ये ७० धावा दिल्या आणि एक विकेट काढली. या पराभवात दोन्ही गोलंदाज जबाबदार ठरले.