चामोर्शी,
Shri Datt Jayanti, श्री दत्त जंयती निमित्याने मधुकर महाराज बोदलकर यांच्या शेतातील श्री दत्त व नागमंदिरात तीन दिवसीय श्री दत्त जयंती व भागवत उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी ढोलताशे, श्री दत्ताची पालखी, कलश यात्रा, श्री दत्ताचे गाणे, भजन दिंडी व राम नामाच्या गजराने अवघी चामोर्शी नगरी दुमदुमून गेली.
श्री दत्त व नाग मंदिर लालडोंगरी येथून कलश यात्रा व पायी पालखी भजन दिंडीच्या गजरात काढण्यात येवून ती शिवाजी हायस्कूल, बाजार समिती, शिवाजी चौक ते चांभारपूरा व शहरातून नाथाचे माहेर येथुन फिरवून परत श्री दत्त व नागमंदिर येथे पालखीचा समारोप करण्यात आला.मंदिरात 2 डिसेंबर रोजी घटस्थापना, रात्री 8 वाजता हभप विजयानंद रोडे महाराज पुलखल यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत प्रवचन, 3 डिसेंबर रोजी भजन, पुजाअर्चा, हरिपाठ, श्री दत्ताची शहरातून रामधून फेरी व पालखी सोहळा व 4 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता श्री दत्त जन्म, श्री दत्ताचा पाळणा, हरिपाठ, गोपाल काला व शेवटी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी Shri Datt Jayanti, पालखीत हभप विजयानंद महाराज रोडे, हभप मधुकर महाराज बोदलकर, माजी सरपंच मालन बोदलकर, नपंचे उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापूरे, गुरुदेव सातपुते, माजी ग्रापं सदस्य सुनंदा ढाक, विलास कुकडे, होमदेव गडकर, मेघराज वालदे, दिपक गडकर, मधुकर गव्हारे, प्रमोद दुधबळे, गोकुळ वासेकर, छगन वैद्य, दिवाकर काटवे, धनराज गव्हारे, नितेश पिपरे, नंदाजी मांडवगडे, प्रशांत भुजबळ, विनोद दुधबळे, गोकुळ वासेकर, खुशाल दुधबळे, एकनाथ बोदलकर, सिंधू कुकडे, सुरेखा बुरांडे, शशिकला गव्हारे, ज्योती पिपरे, गुड्डी मोंगरकर, श्रध्दा वैद्य, वनिता पिपरे, कल्पना मांडवगडे, रंजना बोदलकर, कुंदा बोदलकर, वनिता किरमे, सोनी काटवे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.