सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वदेशी जागरण मंच रथाचे स्वागत

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
वाशीम,
Sanmati Engineering College सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये स्वदेशी जागरण मंच रथाचे स्वागत करण्यात आले. सादर कार्यक्रम हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने घेण्यात आला.
 

Sanmati Engineering College 
कार्यक्रमाला स्वदेशी जागरण मंच विदर्भ प्रांताचे संघटक आनंद गडेकर, वाशीम जिल्हा संयोजक स्वदेशी जागरण मंच मयूर चुंबळकर, मंगेश गवळी, स्वदेशी जागरण मंचा च्या महिला सदस्या कविता खरात व राहुले मॅडम यांच्यासह संस्था सचिव अ‍ॅड. वैशाली वालचळे, संचालक प्रसन्न वालचळे, नीरज वालचळे, प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. कोल्हाटकर सोबतच सर्व विभाग प्रमुख, शिक्षकवर्ग व विद्यार्थी वर्ग यांची उपस्थिती होती.
स्वदेशी जागरण मंच च्या वतीने विदर्भ प्रांत संघटक आनंद गडेकर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना स्वदेशी वस्तूंचा वापर, परदेशी वस्तूंवरचे आपले अवलंबन व स्वावलंबी भारत अभियान व त्यामधील भारतीय नागरिकांच्या सहभागाची माहिती दिली. मंगेश गवळी कविता खरात यांनी देखील आपल्या मार्गदर्शनात स्वदेशी वस्तू वापरून आपण भारतीय नागरिक आपल्या अर्थव्यवस्थेला कशी चांगली चालना देऊ शकतो व भारतीय अर्थव्यवसथा कशी भक्कम करु शकत यावर प्रकाश टाकला .
स्वदेशी जागरण मंच यांनी असा स्तुत्य उपक्रम सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये आयोजित केल्याबद्दल मुकुंद एज्युकेशन सोसायटीच्या सचिव वैशाली वालचळे आणि संचालक प्रसन्न वालचळे, नीरज वालचळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थिनी मोक्ष लुले हिने केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाने परिश्रम घेतले.