मुंबई,
Vishakha Subhedar मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचे नाव नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. सध्या त्या दमयंती दामले या नाटकात झळकत असून, तसेच ‘शुभविवाह’ या मराठी मालिकेतही दिसत आहेत. व्यस्त अभिनय आणि कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढून विशाखा सुभेदार यांनी अलीकडेच गिरनार पर्वताची आव्हानात्मक आणि आध्यात्मिक यात्रा पूर्ण केली आहे. ही यात्रा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या अनुभवाचे वर्णन सोशल मीडियावर केले आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विशाखा सुभेदार एक व्हिडीओ शेअर करताना दिसतात, ज्यात त्या गिरनार पर्वताच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. या यात्रेत त्यांच्यासोबत त्यांच्या पती, अभिनेते पंढरीनाथ कांबळी देखील होते. विशाखाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ही यात्रा “भरत बलवल्ली” ह्या त्यांच्या मित्रामुळे शक्य झाली आणि देवाच्या कृपेने सर्व मार्ग सुलभ झाले.
विशाखा म्हणाल्या Vishakha Subhedar की, “आयुष्यात मला कधीच वाटलं नव्हतं मी ह्या इतक्या पायऱ्या चढेन. जेमतेम 10-15 पायऱ्या चढणारी मी 5000 पायऱ्या चढले. पाय थरथरत होते, गुढघे बोलत होते, पण नाम काळजात आणि मुखात सुरुच होतं. महाराजांनी सर्व अवघड वाट सोपी केली. रोपवे आधीच सोय केलेली होती. अर्धा गड चढल्यावर स्वतः मला पुढे नेले.”दर्शनानंतर उतरताना मात्र गुडघ्याची समस्या निर्माण झाली, ज्यामुळे तिला डोलीवर उतरावे लागले. विशाखाने त्या डोलीवाल्याचे आभार मानले आणि सांगितले की, “त्या माणसांची कमाल आहे, एवढं ओझं घेऊन चढा-उतरायचं सोपं नाही.”
विशाखाने आपल्या अनुभवाबद्दल भावनिक शब्दांत सांगितले की, “दर्शन दोन मिनिटांचे होते, पण डोळे भरले, मन तृप्त झाले, काळजात देव भरला, आणि देव मायेची शिदोरी मिळाली. अन्नछत्र मधला प्रसाद, पाणी, शिस्त आणि पेटती धुनी सर्व काही भारावून टाकणार होते. हा सहा दिवसांचा प्रवास मंत्र, श्लोक, जप आणि ध्यान करत गेला.”या यात्रेत केवळ आध्यात्मिक अनुभव नव्हे, तर एक थ्रीलसारखा प्रवास देखील होता. विशाखा आणि त्यांचा नवरा महेश, तसेच पॅडी यांनी संपूर्ण यात्रा त्यांच्या गाडीने केली, ज्यामुळे प्रवास अधिक मजेदार झाला.विशाखा सुभेदारची ही गिरनार यात्रा त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. अभिनयाच्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून त्यांनी घेतलेला हा अनुभव आध्यात्मिक शांतीसह शारीरिक मेहनतीचीही झलक देतो.