शहीद गोवारी फ्लायओव्हरवर पुन्हा बॅरिकेट उडाले

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Winter Session शहीद गोवारी फ्लायओव्हरवर जड वाहनांची मनाई असूनही ट्रक व कंटेनरची बेफाम वाहतूक सुरूच आहे. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी बसवलेले नवीन बॅरिकेट काल रात्री एका अज्ञात ट्रकने जोरदार धडकेत उडवले. लोखंडी बॅरिकेट पूर्णपणे वाकले आहे.
 
fly
 
हिवाळी अधिवेशनामुळे फ्लायओव्हरवर स्पीड ब्रेकर व बॅरिकेट बसवले गेले असतानाही नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. या पुलाची रचना हलक्या व मध्यम वाहनांसाठीच असल्याने जड वाहनांचा भार धोकादायक ठरत आहे. Winter Session सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण डबली यांनी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात व नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर दंड लावावा, अशी मागणी केली आहे.
सौजन्य:डॉ. प्रवीण डबली,संपर्क मित्र