मुंबई,
25000-schools-in-maharashtra-closed महाराष्ट्रात आज तब्बल २५ हजार शाळांचे दरवाजे बंद असून दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या तोंडावर हा मोठा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. खासगी, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच गैर-शिक्षण कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी एकत्र आले आहेत. मुंबईत या बंदचा फारसा परिणाम जाणवला नसला तरी मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण ठप्प झाले.

शिक्षकांनी अध्यापक समायोजनातील त्रुटी दूर कराव्यात, टीईटीची सक्ती थांबवावी, ऑनलाईन कामांचा व गैर-शैक्षणिक जबाबदाऱ्यांचा वाढता बोजा कमी करावा आणि शिक्षण क्षेत्रातील काही जुन्या योजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशा मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील सुमारे १८ हजार माध्यमिक शाळांमध्ये दिवसभर शिकवणी पूर्णपणे बंद राहिली. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनानेही कठोर भूमिका घेतली आहे. 25000-schools-in-maharashtra-closed ५ डिसेंबर रोजी कोणत्याही परिस्थितीत शिक्षण कार्यात अडथळा येऊ नये, अन्यथा संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा दिला आहे. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्यांचा एक दिवसाचा वेतन कपात करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना शाळा सुरू ठेवण्यासाठी कडक निर्देश जारी केले आहेत.
सरकारकडून वेतन कपातीचा आदेश आल्यानंतर शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आणखी तीव्र झाले आहे. महानगरीय शिक्षक संस्थेने स्पष्ट केले की वेतनकपात हा शिक्षकांच्या हक्कांवर घाला असून आंदोलनाला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. शिक्षकांच्या ठाम भूमिकेमुळे आणि सरकारच्या कडक आदेशांमुळे आगामी काही दिवसांत दोन्ही बाजूंत संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 25000-schools-in-maharashtra-closed शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेला हा तणाव निकाली लागेपर्यंत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.