अमरावती केंद्रातून अंबापेठ क्लबचे ‘वारकरी’ प्रथम

६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
अमरावती,
marathi natya sprdha ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अमरावती केंद्रातून अंबापेठ क्लब, अमरावती या संस्थेच्या अ‍ॅड. प्रशांत देशपांडे निर्मित ‘वारकरी’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच सरकार बहुउद्देशीय संस्था, अमरावती या संस्थेच्या ‘दशानन’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
 
 

natya sprdha 
 
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे केंद्रावरील अन्य निकालामध्ये पंचशील बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्था, परतवाडा या संस्थेच्या उत्तरायण या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक वैभव देशमुख (नाटक - दशानन), द्वितीय पारितोषिक डॉ. चंद्रकांत शिंदे (नाटक - वारकरी), तृतीय पारितोषिक गणेश वानखेडे (नाटक - उत्तरायण), प्रकाश योजना :- प्रथम पारितोषिक अनुप बहाड ( नाटक - दशानन),
द्वितीय पारितोषिक दीपक नांदगांवकर (नाटक- जेंडर आयडेंटीटी), तृतीय पारितोषिक गायत्री गुडधे (नाटक- वारकरी), नेपथ्य : प्रथम पारितोषिक अ‍ॅड. प्रशांत देशपांडे (नाटक-वारकरी), द्वितीय पारितोषिक शुभम ठाकरे ( नाटक - दशानन), तृतीय पारितोषिक संजय काळे (नाटक- उत्तरायण), रंगभूषा :- प्रथम पारितोषिक निलेश ददगाळ (नाटक- दशानन), द्वितीय पारितोषिक प्रतिक्षा ग (नाटक-वारकरी), तृतीय पारितोषिक अभिजित देशमुख (नाटक- श्वेतवर्णी शामकर्णी), पार्श्वसंगीत: प्रथम पारितोषिक प्रथमेश पुरभे (नाटक- वारकरी),
द्वितीय पारितोषिक अंकित शर्मा (नाटक- दशानन), तृतीय पारितोषिक वैभव ओगले (नाटक- उत्तरायण) वेशभूषा: प्रथम पारितोषिक अ‍ॅड. श्रध्दा पाटेकर (नाटक- वारकरी), द्वितीय पारितोषिक अभिजित झाडे ( नाटक - दशानन),
तृतीय पारितोषिक किर्ती देशमुख (नाटक- श्वेतवर्णी शामकर्णी), उत्कृष्ट अभिनय :- रौप्यपदक (पुरुष) वैभव देशमुख (नाटक - दशानन), रौप्यपदक (महिला) रिया गिते ( नाटक - वारकरी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : रेणूका पुराणिक (नाटक- दशानन), अनुराधा वाठोडकर ( नाटक- उत्तरायण), सिध्दी काळे (नाटक- श्वेतवर्णी शामकर्णी), मोहिनी राठोड ( नाटक - कटपिस सासू),
सौरभ शेंडे (नाटक-जेंडर अन् आयडेंटिटि), अजित वडवेकर (नाटक- एकेक पान गळावया), डॉ. चंद्रकांत शिंदे (नाटक- वारकरी), किशोर तळोकार (नाटक-श्वेतवर्णी शामकर्णी) यांना मिळाले आहे.marathi natya sprdha
१४ ते २८ नोव्हेंबर कालावधीत छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, अमरावती येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुकुंद महाजन, गुरु वठारे आणि विजया कुडव यांनी काम पाहिले. अमरावती जिल्हा नाट्य परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.