13.50 ग्रॅम मेफोड्रॉन पावडरसह दोघांना अटक

2 लाख 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
चंद्रपूर,
Chandrapur police, चंद्रपूर-नागपूर मार्गावरील एका धाब्यावर मेफोड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री करीत असताना दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी अटक केली. आरोपींकडून 13.50 ग्रॅम एमडी पावडरसह 2 लाख 230 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रांजल राकेश तिवारी (24, रा. म्हाडा कॉलनी, चंद्रपूर), अदनान जाकीर शेख (24, ऑटो कॉलनी, चंद्रपूर) असे अटकेतील आरोपींची नावे आहे.
 

 Chandrapur police, mephedrone seizure, drug arrest 
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना दोन व्यक्ती मेफोड्रॉन पावडर विक्री करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर येथील नागपूर मार्गावरील एका धाब्यावर येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून आरोपी प्रांजल तिवारी, अदनान शेख यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून 3.50 ग्रॅम मेफोड्रॉन पावडर, दुचाकी, रोख रक्कम तसेच दोन भ्रमणध्वनी असा एकूण 2 लाख 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरूध्द रामनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्‍वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, हवालदार सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान खान आदींनी केली.