गडचिरोली,
cotton farmers कापूस उत्पादक शेतकर्यांनी सीसीआयच्या हमीभाव खरेदी केंद्रवरच आपला कापूस विक्री करावे, असे आवाहन दि. महाराष्ट्र मार्केटीुंग फेडरेशन मुंबईचे संचालक चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल गण्यारपवार यांनी केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार cotton farmers समिती चामोर्शी कार्यक्षेत्रात मे. आस्था जिनिंग अॅड प्रेसिंग अनखोडा आणि मे. प्रिंन्स जिनिंग अँड प्रेसिंग चंदनखेडी (अनखोडा) येथे ससीआयचे खरेदी केंद्र आहे. शासनाच्या हमीभावाप्रमाणे प्रती क्विंटल 8100 रुपये प्रमाणे खरेदी सुरु आहे. ज्यांनी अजुनपर्यंत नोंदणी केली नाही, त्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी मोबाईलमध्ये ‘कपास किसान’ अॅप डॉऊनलोड करून नोंदणी करावे. त्यासाठी पीक पेरा असलेला अद्यावत सातबारा, बँक पासबुक, आधार कार्ड आदी कागदपत्र आवश्यक आहे. हे सर्व कागदपत्र त्या अॅपवर डॉऊनलोड करावे. नोदणी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत असल्याने जास्तीत जास्त शेतकर्यांनी नोंदणी करून सीसीआयच्या खरेदी केंद्रावर विक्री करावे. ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी, उपबाबार कार्यालय येनापूर, आष्टी किंवा जिनिंग अँड प्रेसिंग येथील कर्मचार्यांशी संपर्क करावे, असे आवाहन अतुल गण्यारपवार यांनी केले आहे.
याशिवाय बाहेरील जिल्ह्यातील जिनींग कंपनी मालकांनी कापूस ने-आण करणार्या ड्रायव्हर यांना क्विंटलमागे (मामूल)100 रुपये मिळत असल्याने शेतकर्याना खासगी विक्री करण्यास प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी आपला माल सीयीआयच्या खरेदी केंद्रावरच विक्री करावा असेही आवाहन गण्यारपवार यांनी केले आहे.