नवी दिल्ली,
rbi reduces repo rate भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या ताज्या पतधोरण बैठकीत मोठा निर्णय घेत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात जाहीर केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की सुधारित व्याजदर तात्काळ लागू होत आहेत, आणि याचा थेट फायदा गृहकर्जदारांना मिळणार आहे. रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर आला असून, बँकांकडून कर्जाचे दर आणखी कमी करण्याची शक्यता वाढली आहे.
गव्हर्नर मल्होत्रा यांनी अर्थव्यवस्थेच्या आगामी प्रवासाबाबत आशावाद व्यक्त करताना सांगितले की मागील महिन्यातील आव्हानांनंतरही पुढील काही महिने जीडीपी वाढ आणि महागाई नियंत्रणाच्या दृष्टीने समाधानकारक असतील. महागाईचे लक्ष्य २ टक्के निश्चित करण्यात आले असून दुसऱ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ ८.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वाढ दर ८ टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चालू वर्षात आरबीआयने रेपो दरात केलेली ही चौथी कपात ठरली आहे.rbi reduces repo rate फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये प्रत्येकी २५ बेसिस पॉइंट्सची कपात, जूनमध्ये तब्बल ५० बेसिस पॉइंट्सची मोठी घट, आणि आता आणखी २५ बेसिस पॉइंट्सची कपात अशा एकूण १.२५ टक्के घटीनंतर रेपो दर सलग खाली सरकला आहे. वर्षाच्या सुरुवातीला ६.५० टक्क्यांवर असलेला रेपो रेट आता ५.२५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
दरकपातीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी वाढून ८५,५०० च्या वर पोहोचला आहे, तर निफ्टी ७५ अंकांनी चढून २६,११० वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेने तर तब्बल ३६४ अंकांची झेप घेत बाजारातील उत्साहात भर घातली आहे.