बाल वैज्ञानिक प्रदर्शनीत गुरुकुलचे विद्यार्थी जिल्हास्तरावर

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
कारंजा
Karanja, 53rd Children Science Exhibition, येथे झालेल्या ५३ व्या बाल वैज्ञानिक प्रदर्शनीत कारंजा तालुयातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात गुरुकुल पब्लिक स्कूलच्या नववीचे विद्यार्थी श्रृती ढोबाळे, देवांशू चाकोरे यांना पहिल्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. या प्रदर्शनीमध्ये यांनी ‘नेस्ट जनरेशन किसान’ या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते.
 

Karanja, 53rd Children Science Exhibition 
हे प्रोजेट विज्ञान शिक्षक रेणू खडेकर, पूजा पवार, योगिता नासरे, नेहा कराळे, सुजाता किनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेे. आठवीची विद्यार्थिनी धनश्री जती हिने प्रश्नमंजुषामध्ये दुसरा क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संचालक, मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले.