नागपूर,
forest department वन विभागाचे मुख्य कार्यालय नागपुरातच कायम ठेवण्याची मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. व्हेरायटी चौकातील गांधी पुतळयासमोर आयोजित आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आंदोलनात अरुण केदार यांच्यासह युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष मुकेश सुनील चोखारे, प्रशांत नखाते, गुलाबराव धांडे आदी सहभागी झाले होते.
वन विभागाचे मुख्य कार्यालय मुंबईत हलविण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव उघडकीस आला आहे. नागपूर करारप्रमाणे हे कार्यालय नागपुरात वन विभागाचे कार्यालय असावेत. इतर विभागाचे कार्यालय सुध्दा नागपूरात स्थलांतरीत करावयाचे होते. परंतु प्रत्यक्षात अनेक कार्यालय मुंबई पुण्यात आहे. विदर्भातील जनतेने वनाचे व संवर्धन केले आहे.forest department यासंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीने मागील महिन्यात मुख्यमंत्री यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयला निवेदन दिले आहे. हिवाळी अधिवेशन काळात याविषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे.