अनिल फेकरीकर
नागपूर,
vts technology स्वयंपाकाच्या सिलेंडरमध्ये एलपीजी हा ज्वलनशील वायू भरलेला असतो. या ज्वलनशील एलपीजी वायूची वाहतूक एका खास टँकरमधून केली जाते. याकरिता खूप काळजी घ्यावी लागते. पण काही त्रुटी झाली अन् 23 ऑगस्ट 2025 रोजी पंजाबच्या होशियारपूर येथे एलपीजी टँकरचा अपघात झाला. हा अपघात पाहता प्रत्येक टँकरला व्हीटीएस तंत्रज्ञान लावण्याचे अनिवार्य करण्यात आले.
हीच अनिवार्यता पाहता संपूर्ण देशात एलपीजी वायूच्या पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला. त्याचा फटका नागपूरसह जिल्ह्यातील 25 लाख ग्राहकांनाही बसला आहे. तेही सिलेंडरसाठी दारोदार हिंडत असल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र हिंदूस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश टँकरला व्हीटीएस तंत्रज्ञान लावण्याचे काम पूर्णत्वास गेल्याने 25 डिसेंबर 2025 पर्यंत एलपीजीचा पुरवठा सुरळीत होईल. परिणामी नागपुरातील सर्वच ग्राहकांना दिलासा मिळण्याचे संकेत एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिले.
वर्तमानात एचपीसीएल, आयओसीएल, बीपीसीएल या तीन कंपन्यांमार्फत सिलेंडरचा पुरवठा केला जातो. याचा रिफिलिंग प्लांट खापरी आणि धवलपेठ बुटीबोरी येथे आहे. या ठिकाणी आलेल्या टँकरमधील एलपीजी वायू सिलेंडरमध्ये भरून त्याचा जिल्ह्यासह नागपुरातील एचपीसीएलच्या 66 आणि इतर कंपन्यांच्या एजन्सीमार्फत ग्राहकांना पुरवठा केला जातो. आज घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 904 रुपये 50 पैसे आहे. तर व्यावसायिक सिलेंडर 1755 रुपयांत मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी विशिष्ट क्रमांकावर नोंदणी करताच दुसèयाच दिवशी सिलेंडर घरपोच मिळत होते. पण पंजाबमधील होशियारपूर येथे अपघात घडल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने जीपीएसच्या धर्तीवर व्हीटीएस तंत्रज्ञानावर भर दिल्याने त्याचा पुरवठ्यावर फरक पडला.vts technology एचपीसीएलच्या खापरी प्लांटला हैदराबाद येथून टँकरमार्फत एलपीजी वायूचा पुरवठा केला जातो. दरम्यान, कुडकुडत्या थंडीमुळे मागणीत वाढ होताच सर्वत्र सिलेंडर मिळण्यासाठी मारामार सुरू झाली. आता एलपीजी वाहून नेणारे टँकर व्हीटीएस तंत्रज्ञानाने युक्त झाल्याने सामान्य ग्राहकांना लवकरच सिलेंडर सहजतेने मिळेल असेही अधिकाèयांनी स्पष्ट केले आहे.