आनंदवार्ता! २५ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
मुंबई,
maharashtra farm loan राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेवर कोणतीही मर्यादा ठेवली जाणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्वीच्या योजनांमध्ये दीड ते दोन लाखांपर्यंतची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते, पण आता नवीन निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 

maharashtra farm loan 
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, “राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आली आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सरकारला सादर करेल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे.”
 
 
राज्यातील maharashtra farm loan सुमारे २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीत आहेत. त्यांच्या बँकांवरील थकबाकीची रक्कम जवळपास ३५,४७७ कोटी आहे. यापूर्वी २०१७ मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दीड लाखांची कर्जमाफी जाहीर केली होती, तर २०१९ मध्ये ही मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवण्यात आली होती. या मर्यादेमुळे अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत. पण सध्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर थकबाकीदार शेतकऱ्यांचा “सातबारा उतार” कोरा केला जाणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.या योजनेत सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, आणि त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कृषीमंत्र्यांच्या मते, नवीन योजना पारदर्शक आणि सर्वसमावेशक असून शेतकऱ्यांच्या आर्थिक भारावर लक्ष देणारी आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गावर मोठा सकारात्मक परिणाम होणार असून, आगामी काळात कृषी क्षेत्रातील स्थैर्य आणि शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.