नागपूर,
Maharashtra government criticism महाराष्ट्रात इतके लाचार व दीनवाणे सरकार कधी बघितले नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धर्न सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केला.माजी प्रदेशाध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, संदेश सिंगलकर, दिनेश बानाबाकोडे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
राज्यातील महायुती सरकारला आज एक वर्षे पूर्ण झाली. या वर्षभरातील सरकारच्या कारभारावर या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांनी आसूड ओढले. सपकाळ म्हणाले की, मागे वळून बघितले तर या सरकारने महाराष्ट्राला काय दिले? या एक वर्षात अराजकता, द्वेष, मत्सर, जाती-जातीतली भांडणं, कायदा व सुव्यवस्थेची लक्तरं, चांगल्या-चांगल्या सरकारी जमिनी विकणं, मुंबई उद्योगपतीच्या घशात घालणे, याकरताच हे वर्ष लक्षात राहील.
माणूस किती खोटा बोलू शकतो, याचीदेखील परिसीमा सरकारने ओलांडली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान यांनी दिल्लीश्वरापुढे गहाण ठेवलेला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी योगदान देण्याची तयारी नाही. कुठल्याही प्रकारची सभ्यता, लोकशाहीचे संकेत पाळायची तयारी नाही. मुख्यमंत्री हे केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करताहेत, असेच चित्र आहे. महाराष्ट्राच्या धोरणात्मक निर्णयाकरिता दिल्ली गाठावी लागते. सरकारच्या पातळीवर अनेक गलथान कारभार आहे. नाशिक वा रायगड पालकमंत्री नियुक्ती हे नाकर्ते सरकार करू शकले नाही, असे अनेक आरोप सपकाळ यांनी केले.
विजय वडेट्टीवार
देवेंद्र फडणवीस सरकारने मागील वर्षभरात 23 लाख 67 हजार कोटींची कामे कंत्राटदारांना वाटून दिली व त्यातील कमिशन ते खात आहेत, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. या सरकारच्या कारभारावर श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली.लाडक्या बहिणीपासून सुरू झालेली सरकारची सुरुवात लाडक्या कंत्राटदारापर्यंतयेऊन पोहोचली. महाराष्ट्रात 5 कंत्राटदारांना स्पर्धेविना 23 लाख 67 हजार कोटींची कामे दिली. महाराष्ट्रचे वाटोळे करीत असताना कंत्राटदारांचे चांगभलं केले. सामाजिक घडी विस्कटून टाकण्याचे काम केले.
महाराष्ट्रात Maharashtra government criticism रोज 2-3 शेतकèयांच्या आत्महत्या होत आहेत. कर्जमुक्तीसाठी शेतकरी टाहो फोडत आहे. अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठे संकट आले आहे. काही करंटे व पोट्टे पोसले आहेत. हे करंटे महाराष्ट्राचे वाटोळे करायला निघाले आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
------------------------------------