राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल व ओल्ड एज होम उभारण्यात येणार

ना. डॉ. भोयर यांची संकल्पना

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
वर्धा,
dr pankaj bhoyar गृह निर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी काम कारणार्‍या महिला व ज्येष्ठ नागरिकांनासाठी अभिनव अशा योजनेची मुहर्तमेढ रोवली आहे. म्हाडाच्या माध्यमातून प्रमुख शहरांमध्ये वर्किंग वुमन होस्टेल व ओल्ड एज होम उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.
 

dr.bhoyar 
 
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल व ओल्ड एज होम उभारण्यसंदर्भात आवश्यक जागा, सुविधा आणि निधी नियोजनाबाबत तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे ही शासनाची जबाबदारी असून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल व ओल्ड एज होम उभारण्याचा निर्णय डॉ. पंकज भोयर यांनी घेतल आहे. या प्रकल्पासाठी शासन म्हाडाला सर्वोतपरी सहकार्य करेल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. जिल्ह्यातील शासनाच्या जागेपैकी किती जागा म्हाडाच्या प्रकल्पासांठी मिळू शकतात त्याची माहिती घेवून जास्तीत जास्त प्रकल्प राबवा. तसेच म्हाडा प्रकल्पांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी म्हाडाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.