हिंदी विद्यापीठातील प्राध्यापकच्या शोधात मुंबई पोलिस वर्धेत

*विद्यार्थिनींशी छेडछाड केल्याचा आरोप

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
वर्धा,
dr anwar ahmad siddiqui महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील प्राध्यपक डॉ. अनवर अहमद सिद्धिकी हा मुंबईच्या सेंट जेवियर्स कॉलेजच्या सेमिनारसाठी गेले होते. तेथे त्यांनी छेडछाड केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केल्यावर मुंबईच्या आजाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने डॉ. अनवर सिद्धिकी यांच्या शोधासाठी १ डिसेंबरला मुंबई पोलिसांची टीम वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयात पोहोचली. मात्र, त्याची तब्येत खराब असल्याने व त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असल्याने मुंबई पोलिसांना डॉ. अनवर सिद्धिकी यांना ताब्यात घेतले नाही.
 

dr anwar 
 
 
डॉ. अनवर सिद्धिकी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यांच्यावर दीड वर्षांपासून उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सेवाग्राम रुग्णालयाच्या मानसिक रोग विभागात दाखल आहेत. तर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी वर्धा शहर पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्याची कारवाई टळली.dr anwar ahmad siddiqui या संदर्भात कुलगुरू कुमुद शर्मा यांच्या सोबत सम्पर्क केला असता आपल्या सोबत जन सम्पर्क अधिकारी बोलतील असे सांगितले. जन सम्पर्क अधिकारी मिरगे यांनी दिलेल्या माहिती नुसार ही घटना आम्हला मुंबई येथील वृत्त पत्रातून कळली. मात्र, आमच्यकडे पोलीस आले नाहीत असे ते तरुण भारत सोबत बोलताना म्हणाले. दीड वर्षपासून ते मानसिक आजारी होते तर नोकरीत कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.