प्रियकराचा खून करुन प्रेयसीचा आत्महत्येचा बनाव

- अखेर प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल अनिल कांबळे

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
नागपूर,
murder लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रियकराच्या छातीत चारवेळा चाकू भाेसकून प्रेयसीने खून केला. मात्र, त्यानंतर हत्याकांड लपविण्यासाठी तरुणीने स्वतःवर चाकूने वार केले आणि प्रियकराने हल्ला केल्यानंतर आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, पाेलिसांच्या तपासात गुन्हा उघडकीस आल्याने प्रेयसीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बालाजी कल्याणे (24, मुदखेड, नांदेड) असे मृताचे नाव आहे. तर रितू देशमुख असे जखमी प्रेयसीचे नाव आहे. दाेघेही नांदेडमधीलच रहिवासी हाेते. रितू ही बीएएमएसची विद्यार्थिनी असून, ती इंटर्नशिप करीत हाेती. तर बालाजी पाेलिस भरतीची तयारी करीत हाेता.
 

खून  
 
 
दाेघांमध्येही चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू हाेते. बालाजी त्याच्या एका मित्रासाेबत नंदनवन काॅलनीत भाड्याने राहत हाेता. रितूदेखील जवळच राहत हाेती. बुधवारी रात्री ती बालाजीकडे गेली. एक वाजेपर्यंत तिघांनीही गप्पा मारल्या. त्यानंतर मित्र दुसऱ्या खाेलीत झाेपायला गेला. रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास बालाजीसाेबत रितूचा वाद झाला. त्यानंतर झाेपेत असलेल्या बालाजीच्या छातीत चारवेळा चाकूने वार करुन प्रेयसीने खून केला. त्यानंतर स्वतःवर चाकूने वार करुन जखमी करुन घेतले. बालाजीने हल्ला करुन स्वतः आत्महत्या केल्याचा बनाव केला.
मित्राने घेतली धाव
बालाजीच्या खाेलीतून ओरडण्याचा आवाज आला. मित्राने आवाज दिला असता रितूने दरवाजा उघडला नाही. शेवटी 20 मिनिटांनंतर तिने दरवाजा उघडला. बालाजी रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडला हाेता व रितूच्या हात तसेच शरीरावरदेखील जखमा हाेत्या. मित्राने लगेच घरमालकाला सांगितले. त्यांच्या मदतीने दाेघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. डाॅक्टरांनी बालाजीला मृत घाेषित केले.
आत्महत्येचा बनाव
घटनेची माहिती मिळताच नंदनवन पाेलिस घटनास्थळी पाेहाेचले आणि रितूची चाैकशी केली. बालाजीने तिच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वतःवरही हल्ला केला, असे तिने सांगितले. मात्र, तीदेखील जखमी असल्याने चाैकशी झाली नाही. बालाजीच्या अंगावर चार ते पाच खाेल जखमा आहेत. कुठलीही व्यक्ती स्वत:हून इतका खाेल आघात करू शकत नाही, असे डाॅक्टरांचे म्हणणे हाेते. त्यामुळे पाेलिसांचा संशय बळावला. शेवटी रितूने खून केल्याचे स्पष्ट झाले.murder त्यामुळे पाेलिसांनी तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
प्रेयसीच्या वडिलांचा विराेध
रितूचे वडिल शिक्षक असून सधन शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांना सरकारी नाेकरीवर असलेला जावाई हवा हाेता. मात्र, बालाजीसाेबत मुलीचे प्रेमसंबंध असल्याची त्यांना माहिती हाेती. त्यानेही लग्नाची मागणी घातली हाेती. मात्र, तिच्या वडिलांना लग्नास विराेध केला हाेता. बालाजीने लग्नाचा तगादा लावला तर रितू वडिलांच्या शब्दाखातर त्याला हाेकार देत नव्हती. यातूनच हे हत्याकांड घडल्याची माहिती समाेर आली.