२५ प्रवाशी वाचले! धावत्या खाजगी बसला अचानक आग लागली

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
अहिल्यानगर,
Ahilyanagar bus incident, पुण्याहून बीडकडे जात असलेल्या कन्हैया ट्रॅव्हल कंपनीच्या खाजगी आरामबसला शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. या थरारक घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली, मात्र सुदैवाने २७ प्रवाशांपैकी कोणीही जखमी झालेले नाही.
 

Ahilyanagar bus incident, 
घटनास्थळ अहिल्यानगर शहराजवळील बाह्य वळण रस्त्यावर जामखेड रस्ता मार्गे अरणगाव – बांबुर्डी घुमट फाटा येथे होते. थंडीमुळे प्रवासी गाढ झोपेत असल्याने बसमध्ये आग लागल्याचे काहींच्या लक्षात आले नाही. मात्र बस चालकाने तातडीने हालचाल ओळखत प्रवाशांना जागे करून सुरक्षितपणे बाहेर काढले. भर रस्त्यात घडलेली ही घटना पाहून प्रवासी घाबरले होते.
 
 
माहिती मिळताच Ahilyanagar bus incident, अहिल्यानगर महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले की, आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. नगर तालुका पोलीसांनीही घटनास्थळाचा तपास करून नोंद केली आहे. प्राथमिक तपासणीत, बसमधील वातानुकुनी यंत्रणेमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी सांगितले.कंपनीच्या चालकाला चौकशीसाठी पोलिसांनी पाचारण केले असून त्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेने प्रवाशांमध्ये एक थरार निर्माण झाला, मात्र तत्काळ सुरक्षित बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली.