गोंदिया,
school principal arrest जिल्हा परिषद शाळेत कार्यरत मुख्याध्यापकाने शाळेतीलच विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे करून विनयभंग केेल्याचा व गुरूशिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत सोनबिहरी येथे घडला. तक्ररीवरून पोलिसानी गुन्हा दाखल करून नराधम मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. ओमप्रकाश मनिराम पटले (47) असे आरोपीचे नाव आहे.
सोनबिहरी जिप शाळेत इयता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या 10 वर्षीय विद्यार्थीनीशी गत काही महिन्यांपासून आरोपी ओमप्रकाश पटले हा अश्लिील चाळे करीत होता. यामूळे तिच्या वागणुकीत पालकांना फरक जाणवला. तिला विचारात घेऊन पालकांनी विचारण कली असता घडलेला प्रकार सांगीतला. पालकांनी मुलीसह दवनीवाडा पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी मुख्यध्यापकाला अटक करून त्याच्याविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75 (1), सहकलम 8, 9, 12 व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यालयाने आरोपीला न्यायालयील कोठडी ठोठावली असून भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे दवनीवाडाच्या पोलिस निरिक्षक वैशाली ढाले यांनी सांगीतले.