अनिल कांबळे
नागपूर,
winter assembly आगामी 8 ते 14 डिसेंबरदरम्यान नागपुरात हाेणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बंदाेबस्तासाठी जवळपास सहा हजार पाेलिस कर्मचारी सज्ज झाले आहेत. महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या निवासस्थानापासून सचिवालय, विधिमंडळाचा परिसर असलेल्या सिव्हिल लाईन्सला पाेलिस छावणीचे स्वरुप आले आहे. हिवाळी अधिवेशन बंदाेबस्तासाठी शहर आणि बाहेर जिल्ह्यातील मिळून एकूण 7 हजार पाेलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यामध्ये राज्य राखीव पाेलीस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्यांचा समावेश आहे.
बंदाेबस्ताचे नियाेजन करणाऱ्या पाेलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनादरम्यान शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित रहावी आणि शहरात येणाऱ्या मंत्रीमंडळासह विराेधीपक्षातील नेत्यांच्या बंदाेबस्तासाठी राज्यभरातून पाेलिसांचा माेठा फौजाटा नागपुरात येणे सुरू झाले आहे. यंदाचा अधिवेशन कालावधी आठच दिवसांचा असला तरी त्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून 3 हजारांहून अधिक पाेलिस बंदाेबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. तसेच राज्य राखीव पाेलिस दलाच्या प्रत्येकी 120 जवानांची संख्या असलेल्या पाच तुकड्या शहरात दाखल झाल्या आहेत.
अधिवेशन काळात मंत्र्यांच्या निवासस्थानापासून ते विधिमंडळ सचिवालय, मंत्र्यांची निवासस्थाने, हैदराबाद हाऊस, आमदार निवास, सुयाेग या सारख्या सरकारी निवासस्थानांमध्ये अधिकाऱ्यांची रेलचेलही सुरू झाली आहे. अधिवेशनाच्या बंदाेबस्तात पाेलिस उपायुक्त स्तरावरील 10 अधिकारी, सहाय्यक पाेलिस उपायुक्त स्तरावतील 34 अधिकारी, पाेलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाचे 200 अधिकारी, 2100 पाेलिस अंमलदार टप्प्या टप्प्याने शहरात दाखल हाेत आहेत.winter assembly अधिवेशन सुरू व्हायला जेमतेम चार दिवश शिल्लक राहिले आहेत. अधिवेशन काळातील बंदाेबस्तादरम्यान बाहेरून येणाऱ्यां पाेलिस दल मनुष्यबळासह शहर पाेलिस आयुक्तालय स्तरावरील 2500 पाेलिस फौजाटाही तैनात केला जाणार आहे. राज्य राखीव पाेलिस दलाच्या सशस्त्र तुकड्या मुख्यमंत्री निवास, रामगिरी, देवगिरी, विजयगड, मुख्यमंत्री सचिवालयात तैनात केल्या जाणार आहेत. यासाेबतच काही साध्या वेषातील पाेलिसही तैनात करण्यात येणार आहेत.