चामोर्शीत श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाची कलश यात्रा उत्साहात

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
चामोर्शी,
Shrimad Bhagwat Yagna माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ते 10 डिसेंबर दरम्यान आयोजित श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचा शुभारंभ भव्य कलश यात्रेने झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या यात्रेत जिल्ह्यातील हजारो भाविक भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.विविध देखावे, पारंपरिक आदिवासी नृत्य, ढोल-ताशांचा गजर आणि वारकरी दिंडीने चामोर्शीवासियांचे लक्ष वेधून घेतले. श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक विविधतेचा सुंदर संगम या कलश यात्रेत अनुभवायला मिळाला.
 

 Shrimad Bhagwat Yagna, Kalash Yatra Chamorshi, 
सदर कलश यात्रेत कथावाचक पं. विनोद बिहारी गोस्वामी, हभप मुरलीधर महाराज, माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, बिनाराणी होळी, डॉ. देवश्री होळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद खोबे, मार्कंडेश्‍वर ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे, माजी पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, नागपुरे महाराज मुरखळा, कविता बारसागडे, राजू भांडेकर, श्यामसुंदर उराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रद्धावान भाविकांच्या जयघोषात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झालेल्या या कलश यात्रेने भागवत सप्ताहाला उत्साहपूर्ण आणि दिव्य सुरुवात मिळाली. पुढील सात दिवसांमध्ये श्रीमद भागवत कथा, कीर्तन, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, चामोर्शी शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. श्रीमद भागवत सप्ताहाच्या यशस्वीतेकरीता दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, राकेश भैसारे, प्रतीक राठी, सुनील सोरते, उमेश उईके, सुरज मडावी, पुरुषोत्तम बावणे, शंकर दास, उमेश कुकडे, भोजराज भगत, दिलीप नैताम, अनिल प्रिसिंगलवार, संतोष बात्तूलवार, जयराम चलाख आदी कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत.