नव्या ९५९ शेतकर्‍यांना सौर ऊर्जा कुंपण योजनेचा लाभ

आ. राजेश बकाने यांची पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
देवळी,
solar fencing scheme ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या पीक संरक्षणासाठी अत्यावश्यक ठरलेल्या सोलर ऊर्जा कुंपण योजनेला गती मिळाली. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे फलित म्हणून वर्धा जिल्ह्यातील नव्या ९५९ शेतकर्‍यांना सौर ऊर्जा कुंपण योजनेचा लाभ झाल्याची माहिती आ. राजेश बकाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
 

solar fencing scheme
हिवाळी अधिवेशन solar fencing scheme  २०२४ मध्ये मुद्दा क्रमांक १०१४ द्वारे शेतकर्‍यांना पिकांचे संरक्षण करता यावे यासाठी सौर उर्जा कुंपनाचा प्रश्न उपस्थित केला होता. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजनेअंतर्गत सोलर कुंपणासाठी ७५ टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त १५ हजार मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे अनुदान प्रत्यक्ष शेतकर्‍यांपर्यंत वेळेत पोहोचावे यासाठी आपण अधिवेशनापासून मंत्रालयासोबत अखंड पाठपुरावा केला. याच अनुषंगाने उपवनसंरक्षकांनी २०२४-२५ साठी ९५९ नवीन लाभार्थ्यांची निवड पूर्ण केल्याची माहिती आ. बकाने यांनी दिली. यात वर्धा, देवळी व हिंगणघाट तालुयातील २४८ गावांचा समावेश आहे. या निर्णयामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना उपलब्ध होणारी सोलर कुंपण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. संपूर्ण प्रस्ताव वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर यांच्या स्तरावर असून तेथून शासनाकडे पाठविल्यानंतर मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण होण्याची शयता आहे. शेतकर्‍यांचे नुकसान रोखण्यासाठी सोलर कुंपण अत्यावश्यक आहे. हा प्रश्न आपण सातत्याने मांडत राहणार अससल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
पुढील काही महिन्यांत या योजनेचा व्यापक लाभ हजारो शेतकर्‍यांना मिळणार आहे. देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रासह वर्धा हिंगणघाट तालुयातील गावातील शेतकर्‍यांकरिता ही आनंदाची बातमी असल्याचेही आ. बकाने यांनी सांगितले.