लाखो रुपयांच्या पथादिव्याखाली अंधार

अख्खं गाव उजेडात

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
सेलू,
Ghorad pilgrimage site विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्र घोराड येथे लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जेवर लावण्यात आलेल्या पथ दिव्याखाली अंधार असल्याने अख्खं गाव जरी उजेडात असल तरी संत नामदेव महाराज समाधीकडे जाणार्‍या रस्त्यावर अंधार आहे.
 

Ghorad pilgrimage site 
शासनाने तीर्थक्षेत्र असल्याने बोर नदी घाटावर व संत नामदेव महाराज समाधीकडे जाणार्‍या रस्त्यावर ५२ पोल उभे करून त्यावर सौर ऊर्जा संच बसविण्यात आला. सुरुवातीला काही दिवस या पथादिव्यांनी प्रकाश दिला. हे लाईट चालू बंद करण्यासाठी एका देवस्थानाकडे त्याची जबाबदारी दिली. पण, काही दिवसांनी यातील बहुतांश पथदिवे बंद करण्यात आले त्या काळोखात या समाधी मार्गाने जावे लागत असल्याने काळोखाचा सामना नागरिक व भाविकांना करावा लागत आहे. समाधी परिसरात लोकवस्ती आहे तर गावातील पथदिवे हे ग्रापं प्रशासनाकडे असल्याने या पथदिव्यांची विद्युत खंडित झाल्यास ग्रापंत लक्ष देते त्या मुळे अख्खं गाव उजेडात राहते पण सौर ऊर्जा वरील असणार्‍या लाईटची देखरेख ग्रापंकडे नसल्याचे बोलल्या जात आहे. सहा हजार हून अधिक लोकसंख्या असलेले हे गाव असल तरी त्याची ओळख प्रती पंढरी म्हणून आहे आणि त्याच प्रती पंढरीत संताच्या समाधीकडे जाणारा रस्ता अंधारात हे दुर्दैवच नाही का?
 
 

वाट काळोखाची
 
घोराड येथे Ghorad pilgrimage site असलेल्या शनेश्वर मंदिरात हा सोलर संच बसविण्यात आला. पण, या मंदिराला येणारे वीज देयक मोठ्या प्रमाणात येत असल्याने मंदिर प्रशासनाने काही पथ दिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे सांगण्यात येत आहे. पण शासनाने लावलेल्या पथ दिव्यांना किती ऊर्जा लागेल याचा अंदाज घेतला की नाही ही बाब संशयास्पद आहे. लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ जाणार असला तरी मात्र वाट काळोखातून काढावी लागणार आहे