वर्धा,
teacher strike Wardha, टीईटीची सती नको यासह विविध १५ प्रमुख मागण्यांसाठी आज शुक्रवार ५ रोजी शिक्षकांनी सामुहिक रजा घेत शाळाबंद आंदोलन केले. आंदोलनादरम्यान जिल्हा व तालुकास्तरावर आंदोलनकर्त्या शिक्षकांनी जबाबदार अधिकार्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यात जिपच्या ८४७ शाळांपैकी ८२७ तर नगर पालिकांच्या ३८ पैकी ३५ शाळा या आंदोलनाने बंद होत्या अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली.
प्राथमिक शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्यासंबंधाने राज्य शासनाने शिक्षकांच्या संरक्षणार्थ भूमिका घेऊन न्याय द्यावा. आरटीईच्या कलम २३ मध्ये टीईटी बाबत सुधारणा करण्यासह एनसीटीईच्या अधिसूचनेत दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून आवश्यक पावले उचलण्यात यावी, टीईटी अनिवार्यतेच्या नावाखाली थांबविलेल्या पदोन्नती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद (समायोजित) करण्याचे धोरण रद्द करण्यात यावे, शिक्षण सेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित शिक्षक भरती पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करावी, पदवीधर शिक्षकांमध्ये भेदभाव न करता पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या ८४७ पैकी ८२७ तर नगर पालिकेच्या ३८ पैकी ३५ शाळा बंद होत्या. शिक्षणसेवक मात्र कामावर होते.
आंदोलनकर्त्या शिक्षकांनी आंदोलनादरम्यान जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. वर्धेत निवासी उपजिल्हाधिकारी जाधवर यांना तर तालुयाच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात विजय कोंबे, लोमेश वर्हाडे, अजय भोयर, सतीश जगताप, प्रमोद खोडे, अजय वानखेडे, अरुण झोटिंग, गौतम पाटील, प्रमोद मुरार, रविंद्र राठोड, छत्रपती फाटे, अजय बोबडे, मिलिंद सालोडकर, मारोती सयाम आदी सहभागी झाले होते.