विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून

-यात्रापूर्व तयारीला वेग -८ डिसेंबरपासून प्लॉटचा लिलाव

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
चांदूर बाजार, 
bahiram yatra संपूर्ण राज्यामध्ये दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून त्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात्रेमध्ये दुकानांसाठी लागणार्‍या जागेचा लिलाव ८ ते १६ डिसेंबरदरम्यान होणार आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी सव्वा महिना चालणारी ही यात्रा थंडीच्या काळात येत असल्यामुळे या यात्रेत हंडीचे मटन प्रसिद्ध असते. या भागातील नागरिकांचे कुलदैवत बहिरम बुवा मानला जात असून आदिवासी बांधवांमध्ये देखील बहिरम बाबाला पुजल्या जाते.
 

bahiram yatra 
 
 
यामुळे या यात्रेमध्ये आदिवासी बांधवांची देखील मोठी गर्दी असते. शेतीला लागणारे साहित्य या यात्रेत मोठ्या प्रमाणात विकायला येत असल्याने शेतकरी वर्ग देखील या यात्रेकडे आकर्षिला जात असतो. एकेकाळी या यात्रेत तमाशाच्या घुंगरांचा आवाज गुंजत होता. परंतु माजी आमदार बच्चू कडूंनी या यात्रेतील तमाशे हद्दपार केले व यात्रा कायम ठेवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम याठिकाणी सुरू केले होते. सुरेखा ठाकरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना दोन वर्षे त्यांनी या यात्रेला शासकीय यात्रा जाहीर करून अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले होते.bahiram yatra यामुळे या यात्रेमध्ये गर्दी देखील दुप्पट झाली होती. ही यात्रा जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रात येत असून यात्रेवर देखरेख व संपूर्ण जबाबदारी ही चांदूरबाजार पंचायत समितीकडे असते. त्यामुळे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश घोगरकर यांच्या नेतृत्वात पंचायत विस्तार अधिकारी रामेश्वर रामागडे, निखिल नागे, ग्रामपंचायत अधिकारी संदीप गोहत्रे, शिवप्रसाद सोनोने, रमण भोहते, विकी देशमुख हे यात्रेच्या पूर्वतयारीमध्ये व्यस्त झाले आहेत. यात्रेमध्ये शांतता ठेवण्याची जबाबदारी ही शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यावर राहणार आहे.