नागपूर,
Reshimbagh signal रेशीमबाग चौकातील सिग्नललगत अनेक दिवसांपासून एक कुटुंब वास्तव्यास असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. सिग्नलवर काही क्षण थांबतानाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून व्यक्त होत आहेत.
रेशीमबाग चौकाचे महत्त्व लक्षात घेता ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे. कारण याच मार्गाने अनेक मान्यवर तसेच शहरातील VIP व्यक्ती ये-जा करतात. Reshimbagh signal तरीदेखील पोलिस प्रशासन आणि नागपूर महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. संबंधित कुटुंबाला योग्य ठिकाणी हलवून चौकाची स्वच्छता करण्यात यावी, अशी विनंती नागरिकांनी केली आहे. Reshimbagh signal दुर्गंधी दूर झाली तर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल आणि परिसरात आरोग्यदायी वातावरण पुन्हा निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
सौजन्य: राहुल बनसोड, संपर्क मित्र