विरार इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

सहाय्यक आयुक्त गिल्सन गोंसालविस अटक

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
मुंबई,
virar building collapse मुंबई जवळील वसई-विरार परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. २६ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंटमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत १७ रहिवाशांचा जीव गेला होता. अनधिकृत आणि असुरक्षित स्थितीतील या चार मजली इमारतीचा काही भाग मध्यरात्री अचानक कोसळून परिसरात हाहाकार माजला होता. घटना घडून तीन महिने उलटत असतानाच, या प्रकरणात धोकादायक घोषित केलेल्या इमारतीविरुद्ध आवश्यक ती कारवाई न केल्याबद्दल प्रभाग समिती ‘C’ चे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोंसालविस यांना अटक करण्यात आली आहे.
 

virar building collapse  
गुरुवारी virar building collapse मध्यरात्री गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने गोंसालविस यांना अटक केली. शुक्रवारी दुपारी त्यांना न्यायालयात चौकशीसाठी हजर करण्यात आले. सुमारे एक महिन्यापूर्वी विरार पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र चौकशीदरम्यान त्यांनी दिलेली उत्तरे असमाधानकारक ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतरच पुढील तपासासाठी त्यांच्या अटकेची गरज भासली.
दुर्घटनेनंतर पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी तपासाची सूत्रे गुन्हे शाखा युनिट-३ कडे सोपवली होती. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की संबंधित इमारत धोकादायक असल्याचे घोषीत करण्यात आले होते, मात्र गोंसालविस यांनी ही बाब रहिवाशांच्या निदर्शनास आणून दिली नाही, तसेच विकासकाविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. या दुर्लक्षामुळेच मोठा जीवितहानीचा प्रसंग घडल्याचा आरोप तपास पथकाने नोंदवला आहे.
२६ ऑगस्टच्या रात्री रमाबाई अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला आणि संपूर्ण इमारत हादरून गेली. त्यावेळी अनेक जण झोपेत असतानाच हा अनर्थ घडला. गणेशोत्सव काळात झालेल्या या दुर्घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीती, संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. अनेक कुटुंबांना तातडीने आपले घर सोडावे लागले होते.
 
 
या प्रकरणी virar building collapse महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात येत आहे. गोंसालविस यांच्या अटकेनंतर तपासाला नवं वळण मिळालं असून, पुढील कारवाईबाबत स्थानिकांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.