नागपूर एनडीआरएफ अकादमीत ‘जागतिक मृदा दिन’ उत्साहात साजरा

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
नागपूर,
World Soil Day नागपूर येथील एनडीआरएफ अकादमीत प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र (आरसीओएनएफ) यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी ‘जागतिक मृदा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. मृदा संवर्धन, शाश्वत जमीन व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व याबाबत व्यापक जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
 

World Soil Day 
कार्यक्रमात World Soil Day  तज्ञांनी माती संसाधनांचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक पद्धती अंगीकारण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. प्रमुख वक्त्यांमध्ये एनडीआरएफ अकादमीचे डीआयजी व संचालक डॉ. हरिओम गांधी, आरसीओएनएफचे संचालक डॉ. अजय सिंह राजपूत, सुनीता वाधवा, अभिराज राठी, डॉ. अनुप जैन यांचा समावेश होता. स्थानिक शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या पोहोच उपक्रमाने कार्यक्रमाला विशेष उंची मिळाली. यावेळी प्रशिक्षकांनी शेतकऱ्यांना सीपीआरचे प्रात्यक्षिक देत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. सेंद्रिय व शाश्वत शेतीचे महत्त्व नुक्कड-नाटकातून प्रभावीपणे सादर केले. प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रांतून मृदा संवर्धनाचे संदेश अधोरेखित केले. पर्यावरणीय जबाबदारी व्यक्त करण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. अकादमीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रशिक्षणार्थ्यांनी पर्यावरणीय शाश्वततेसाठी सक्रिय बांधिलकी व्यक्त केली. एनडीआरएफ अकादमी पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक लवचिकता वाढवण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.