"तुझ्या शरीरातील रक्त काढून कुत्र्यांना पजीन!"; VIDEO

UP पोलिसांच्या सिपायाचा व्हिडिओ व्हायरल

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
सीतापूर,  
up-police-constable-video-viral उत्तर प्रदेशातील सीतापुर येथे मुख्य आरक्षी श्याम बाबू शुक्लाच्या दबंगाईचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील लालबाग येथील अटल चौकावरील ‘एव्हरीथिंग @ 99’ या दुकानात ते सामान घेण्यासाठी गेले होते. मात्र, दुकानदाराने सोनेाची चेन मिळत नसल्याचे सांगताच शुक्ला अचानक आक्रमक झाले. त्यानी दुकानात घुसून दुकानदाराला शिवीगाळ करत जीवघेणी धमकी दिली—“तुझ्या शरीरातील रक्त काढून कुत्र्यांना पाजीन!” असा थरकाप उडवणारा संवाद दुकानातील सीसीटीव्हीत स्पष्ट कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
 
up-police-constable-video-viral
 
व्हिडिओमध्ये शुक्ला साध्या वर्दीत दिसत असून, रागाच्या भरात टी-शर्टखालील अवैध शस्त्रासारखी वस्तू बाहेर काढताना देखील दिसतात. दुकानदाराकडे फक्त चेन नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी “तू कोण? माझ्याशी रंगबाजी करतोस? मारून टाकीन तुला!” अशा शब्दांत धमकी दिली. दुकानदार शांत राहण्याचा प्रयत्न करत गाळी न देण्याची विनंती करतो, पण शुक्ला अधिक संतापून त्याला मृत्यूची धमकी देतात.
सौजन्य : सोशल मीडिया 
मुख्य आरक्षी श्याम बाबू शुक्लाचे आधीपासूनच वादग्रस्त वर्तन चर्चेत राहिले आहे. यापूर्वी शहर कोतवालीत तैनातीदरम्यानही त्यांचे अनेक प्रकरणांशी नाव जोडले गेले होते. लखनऊमध्ये झालेल्या वादात त्यानी स्वतःला दरोगा असल्याचे भासवले होते; मात्र चौकशीत ते मुख्य आरक्षी असल्याचे उघड झाले. सरकारी पिस्तुलही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने लखनऊला नेल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या नव्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि रोष दोन्ही निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.