गुवाहाटी
guwahati-viral-video देशभरात सुरू असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाण संकटाचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. कुणाचे परीक्षेचे स्वप्न मोडले, कुणाची लग्नाची मांडवातली वेळ चुकली… पण या सगळ्यात सर्वाधिक हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे असमच्या गुवाहाटी विमानतळावर अडकून पडलेल्या एका पत्नीची.

या महिलेला तिच्या पतीचे पार्थिव शवपेटीमध्ये घेऊन कोलकात्यास जाऊन अंतिम संस्कार करायचे होते. शिलॉंगहून सकाळीच ती मोठ्या वेदनेने, डोळ्यांत अश्रू घेऊन विमानतळावर पोहोचली. मनात केवळ एकच व्याकूळता—पतीच्या गावी अंतिम निरोप देण्याची. पण नियोजित इंडिगोचे विमान निघेल की नाही, याची कोणतीही माहिती तिला मिळेनाशी झाली. चार दिवसांपासून इंडिगोच्या शेकडो उड्डाणांना विलंब होत असल्याने हजारो प्रवासी विमानतळावर अडकले आहेत. उड्डाण रद्द होणे ही साधी बातमी वाटू शकते, पण काहींसाठी ही घटना आयुष्यभर न विसरणारी जखम ठरत आहे. guwahati-viral-video विमान उडेल की नाही, कधी उडेल—याचा कोणताही निश्चित अंदाज नसल्याने प्रत्येक प्रवासी बेचैन आहे. गुवाहाटी विमानतळावरील ही महिला मात्र त्या सगळ्यांपेक्षा जास्त वेदनेत आहे. पतीचे पार्थिव शवपेटीत शांतपणे ठेवलेले, आणि ती स्वतः अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेली. “माझ्या नवऱ्याचे निधन झाले आहे… मला त्यांचे पार्थिव कोलकात्यात अंत्यसंस्कारासाठी कोलकाताला पोहोचण्यास सतत उशीर होत आहे. पण इथं मला कोणी सांगत नाही की माझं विमान केव्हा निघणार… मी काय करू?” — अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती कर्मचाऱ्यांना विनंती करत राहिली. पण उत्तर देण्यासाठी, तिला आधार देण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच नव्हते.

देशभरात अशा कित्येक कथा आहेत—पण या एका महिलेचे दु:ख शब्दांत मावत नाही. guwahati-viral-video पतीचे अंतिम दर्शन देण्याची धडपड आणि विमानतळावर वाढत चाललेली असहाय्यता… इंडिगो संकटाने तिच्या मनावर उमटवलेली वेदना कोण भरून काढणार?