स्मशानभूमीत प्रेत न्यायचं की, नाकाला रूमाल लावायचा!

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
सेलू,
cemetery स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ज्या नगराची ओळख निर्माण झाली नव्हे शासनाने ज्या नगराला पुरस्कृत केले त्या नगरातील स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याच्याकडेला घाणीचे साम्राज्य असावे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. सेलू नगर हे स्वच्छ व सुंदर असल्याचे शासन दरबारी नोंद आहे. येथे तीन स्मशानभूमी आहेत. तीनही स्मशानभूमी या वेगवेगळ्या ठिकाणी असल्या तरी त्या बोर नदीच्या काठावर आहेत.
 

स्मशानभूमी  
 
त्यातील ही एक स्मशानभूमी सेलू शहराच्या शेवटच्या टोकाला आहे. या ठिकाणी जाणारा रस्ता हा आठवडी बाजार भरत असलेल्या बोर नदीवरील नवीन पुलाच्या खालून जातो. पुलाच्या खालून स्मशानभूमीकडे मार्गस्थ होताच घाणीच्या साम्राज्याचे दर्शन होते. जोराची हवा आल्यास येथे मोठ्या प्रमाणात असणार्‍या प्लास्टिकचा असलेला केर कचरा हवेत घिरट्या घालतात. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाचे या कडे दुर्लक्ष कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेलू शहरात कचरा डेपो आहे.cemetery कचरा गोळा करण्यासाठी सतत घंटा गाडी फिरत असताना या परिसरात असणारा कचरा का गोळा करीत नाही या संशोधनाचा विषय आहे. नाली सफाई केल्यानंतर निघणारा गाळ ही रस्त्याच्या कडेला आहे हे विशेष. अन्त्यविधी कार्यक्रमाला सेलू नगरातीलच नागरिक असतात असे नाही तर बाहेरगावाहूनही नातेवाईक येतात. पण स्वच्छतेच्या बाबतीत नाव लौकीक असलेल्या नगरात ही परिस्थिती पाहिल्यावर त्यांना बर वाटत नाही त्याची चर्चा सर्वदूर होते हे योग्य नसल्याची चर्चा गावात सुरू आहे.