आपल्यातील अहंकार घालविण्यासाठी दत्तप्रभूंचा अवतार : सुशीलबुवा देशपांडे

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड,
Sushilbua Deshpande मी पणाची भावना, जी व्यक्तीला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायला लावते, चुका मान्य करू देत नाही आणि सत्यापासून दूर नेते. अशा अहंकारावर मात करण्यासाठी भक्ती आणि ईश्वरचरणी शरणागती हाच खरा मार्ग आहे, असे तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात तद्वतच आपल्यातील अहंकाराला दूर करण्यासाठी श्री दत्त प्रभूंचा अवतार झाल्याचे हभप डॉ. सुशीलबुवा देशपांडे यांनी आपल्या वाणीतून श्रोत्यांना अवगत केले.
 

Sushilbua Deshpande 
२८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत दत्त जयंती सप्ताहानिमित्त श्री गुरु मंदिर संस्थानचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक बाल कीर्तनकारांनी आपली सेवा किर्तनातून श्री गुरु दत्त चरणी समर्पित केली. ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त हभप डॉ. सुशीलबुवा देशपांडे यांच्या दत्तजन्माच्या कीर्तनाने या सप्ताहाचा समारोप झाला. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेऊन त्यांनी दत्तावतारातील विविध वैशिष्ट्ये समजावून सांगितली. असूया रहित मनातच दत्त तत्त्वाचा उदय होत असतो असे ते म्हणाले. वेदशास्त्र संपन्न दिनेश जोशी यांनी गुरुचरित्रातील अध्यायाचे वाचन केले. दत्त जयंती निमित्त हजारो भाविकांनी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला. गुरू मंदिर संस्थान विश्वस्तांच्या मार्गदर्शनात हा सोहळा पार पडला.