आक्रमण युवक संघटनेतर्फे डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Dr. Ambedkar भारतरत्न महामानव प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक (PPID) आणि आक्रमण युवक संघटनेतर्फे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. यानंतर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमला. या अभिवादन कार्यक्रमात आक्रमणचे पूर्व विदर्भ संयोजक प्रमोद पाटील, नागपूर जिल्हा प्रभारी व इन्चार्ज ओपूल तामगाडगे प्रमुखत्वाने उपस्थित होते.
 
Dr. Ambedkar
 
तसेच पीपीआयडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल मडामे, आक्रमण जिल्हाध्यक्ष विशाल बनसोड, सुरज पुरानिक, संदीप चव्हाण, अजय गायकवाड, अश्विन पाटील, दीपक पाटील, अडकिने साहेब, Dr. Ambedkar दर्शन तामगाडगे, राजू मेश्राम, कमल मनपिया, रितेश ढेंगरे, रामदास जोगदंडे आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र