डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
baradshewala-primary-health-center : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात महापरीनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
 
 
BABASAHEB
 
या प्रसंगी भारतीय सैनिक सेवेत प्रशिक्षण घेऊन परतलेले पळसा येथील भूमिपूत्र गोविंद कामाजी निमडगे यांचा साईप्रसाद परिवार आणि आधार प्रतिष्ठान हदगावचे अध्यक्ष निवृत्ती वानखेडे तसेच सचिव गजानन अनंतवार यांच्या आयोजनात सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी गोविंद निमडगे यांचे स्वागत व सन्मान केला. यावेळी मनाठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. केसी बरगे, अशोक दाडे, सेवानिवृत्त भारतीय सैनिक नरवाडे, औषध निर्माण अधिकारी गजानन देशमुख, आरोग्य सहाय्यक संतोष स्वामी, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक पळसेकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद मस्के, सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे, गजानन मस्के, ग्रामपंचायत सदस्य कामाजी निमडगे, आरोग्यसेवक टेकाळे, पडघणे, वाहनचालक गजानन राठोड, परिचर शेख इस्माईल, प्रभाकर दहिभाते, डाटा ऑपरेटर बल्लाळ तसेच विद्यार्थी मुक्ता पहाडे व नंदिनी सोनसळे यांसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
 
 
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी भारतीय सैनिक सेवेत प्रशिक्षण घेतलेल्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले व समाजसेवेत त्यांचे भविष्यातील कार्य यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करत समाजसेवा व देशभक्ती या मूल्यांची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.