भारतीय प्रशिक्षकांची ODI सामन्यांची वेळ बदलण्याची मागणी; उघड केले मोठे कारण

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
ind-vs-sa-3rd-odi भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक तिसरा सामना आज पार पडणार आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने प्रभावी फलंदाजी करत 358 धावांचा डोंगर उभारला होता, मात्र संध्याकाळनंतर पडलेल्या दवेमुळे भारतीय गोलंदाजांना चेंडूवर नियंत्रण ठेवणे कठीण गेले आणि दक्षिण आफ्रिकेने लक्ष्य सहज गाठले. रांचीप्रमाणे रायपूरमध्येही दवेमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि गोलंदाजीला प्रतिकूल वातावरण निर्माण झाले.
 
ind-vs-sa-3rd-odi
 
याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी भारतातील एकदिवसीय सामन्यांची वेळ पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की दुसरा डाव सुरू होताच दव वाढते आणि सामना असमतोल होतो. त्यानुसार, सामने दोन तास आधी सुरू केल्यास दवेमुळे होणारा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. ind-vs-sa-3rd-odi ओल्या चेंडूमुळे गोलंदाजांचे नियंत्रण सुटते, चेंडू हातातून घसरतो आणि फलंदाजांसाठी धावा करणे अधिक सोपे होते, ही अडचण त्यांनी विशेषतः अधोरेखित केली.
तिसरा सामना विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर होणार असून हे मैदान भारतीय संघासाठी अत्यंत अनुकूल ठरले आहे. येथे खेळल्या गेलेल्या दहा सामन्यांपैकी भारताने सात विजय मिळवले आहेत. तरीही नाणेफेकीचे महत्त्व या सामन्यात निर्णायक ठरू शकते. या मैदानावर पाठलाग करणाऱ्या संघांचा विक्रम उत्तम असून २० पैकी १५ सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. ind-vs-sa-3rd-odi त्यामुळे जर संघाला गोलंदाजीपासून सुरुवात करायची असेल, तर कर्णधार केएल राहुलला नाणेफेक जिंकणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.