आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ...मी तुमच्यासाठी सर्व काही सोडल पण...

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
नारनौल,
Live video of suicide प्रेमभंग, एकटेपणा आणि मानसिक छळाच्या वेदना सहन करत अखेर २४ वर्षीय अनुजने सल्फा सेवन करून आयुष्य संपवले. मृत्यूपूर्वी त्याने तब्बल दहा मिनिटांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि इंस्टाग्रामवर पोस्टही केला. त्या व्हिडिओमध्ये अनुज रडत रडत पत्नी सीमा आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करतो. तुम्ही माझ्या आईपासून मुलगा हिरावून घेतलात… तुम्हाला शाप लागेल, असे तो दु:खाने म्हणताना दिसतो. अनुज आणि सीमाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर दोघे झज्जर आणि त्यानंतर अटेली परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. दोघेही कपड्यांच्या दुकानात काम करत होते आणि आयुष्य सुरळीत चालले होते. मात्र, सीमा गर्भवती झाल्यावर ती माहेरी गेली आणि मुलगी जन्मल्यानंतरही परत आलीच नाही. अनुज गेली तीन महिने पूर्णपणे एकटा राहत होता. एकटेपणातून निर्माण झालेली तगमग आणि तणाव त्याच्या मनावर खोल परिणाम करत होते.
 
 
 
anuj susaide
व्हिडिओमध्ये अनुज सांगतो की तो पत्नी आणि मुलीला परत आणण्यासाठी दोनदा सीमाच्या पालकांच्या घरी गेला, मात्र प्रत्येकवेळी त्याला कारणे सांगून परत पाठवण्यात आले. कधी सीमा आजारी असल्याचे, कधी ती नातेवाईकांकडे गेल्याचे सांगितले गेले. मी तिला घेऊन जाईपर्यंत घरात जाऊ नकोस असा दबाव सीमाचे पालक त्याच्यावर टाकत असल्याचा त्याचा आरोप होता. मी माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिच्याशी लग्न केले… माझ्या आईवडिलांना, भावंडांना सोडले… पण मला तीन महिन्यांपासून शांतता मिळालेली नाही, असे तो अश्रू ढाळत म्हणतो. शेवटच्या क्षणांमध्ये तो सल्फरचे पॅकेट दाखवत म्हणतो, माझ्या मृत्यूला सीमा आणि तिचे आई-वडील जबाबदार आहेत. मला न्याय मिळवून द्या.
 
 
 
 
सल्फा सेवनानंतर त्याची प्रकृती झपाट्याने खालावली. कुटुंबाने त्याला सिव्हिल हॉस्पिटल, खाजगी रुग्णालय आणि शेवटी जयपूर येथे नेले. उपचारांसाठी तब्बल दहा लाख रुपये मागितल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि रुग्णालयात पोहोचताच अनुजने अखेरचा श्वास घेतला. अनुजच्या मृत्यूने गुजरावस गाव शोकमग्न झाले आहे. त्याची आई शोकाने बेशुद्ध पडली आहे. गावकरी आणि कुटुंब या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.